“रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे हे संजयला चप्पलेने मारतील”; नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे , रश्मी ठाकरे यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे, त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने झोडतील, अशी जहरी टीका राणे यांनी केली.

तसंच संजय राऊत जिथे बोलावतील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार आहे, असंही त्यांनी म्हटलं. नारायण राणे मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे हे संजयला चप्पलेने मारतील

एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. कशासाठी माहित आहे का? मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत राज्यसभेत येऊन माझ्या बाजूला बसायचा आणि उद्धव ठाकरे तसंच रश्मी ठाकरे यांच्याबाबत जे काही सांगायचा ना ते उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे यांनी संजयला चप्पलेने नाही मारलं तर मला विचारा, अशी टीका राणे यांनी केली.

🤙 8080365706