सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा….

मुंबई : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने महत्त्वाची घोषणा केली असून सानिया मिर्झाने टेनिमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती शेवटची खेळताना दिसणार आहे.गेल्या 20 वर्षांपासून अनेकांसाठी आदर्श असलेली सानिया मिर्झाने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेतील दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया आपला शेवटचा सामना खेळणार आहे. सानियाची कारकीर्द चांगली होती. पण सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे ती कोर्टाबाहेर होती आणि आता तिने कारकीर्द पुढे न नेण्याचा विचार करत निवृत्तीची घोषणा केली आहे. सानिया मिर्झाने 2003 मध्ये प्रो-टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती.

🤙 8080365706