भारतात हिंदूंची संख्या वाढली तरच देश टिकेल: मिलींद एकबोटे

आजरा: भारतात हिंदूची संख्या वाढली पाहिजे तरच हा देश टिकेल अन्यथा लवजिहाद,धर्मांतर सारखे प्रकार वाढत जातील.समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे असे प्रतिपादन हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलींद एकबोटे यांनी केले.

आजरा येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.जनसमुदायाशी संबोधीत करताना ते बोलत होते. जरा येथील पंचायत समिती येथून या विराट मोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने हिंदू बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला.आजरा तालुक्यासह जिल्ह्यातील बांधव सहभागी झाले होते रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता महिला,पुरुष व बालकांनीही उपस्थिती लावली.उष्मा वाढल्यामुळे ठिकठिकाणी पाणी,सरबतची सोय केली होती. मोर्चा सुमारे तासभर चालला.मोर्चा शांततेत झाला.शिवाजी पुतळा येथे याचे सभेत विलीनीकरण झाले.आजरा बँकेजवळ स्टेज घालण्यात आला होता.सुमारे २०० मीटर पर्यंत आलेला जनसमुदाय बाजारपेठ रस्त्यावर बसला होता.

प्रास्ताविक नाथ देसाई यांनी केले.आजऱ्यामध्ये घडलेल्या कांही घटनांची उजळणी करत प्रत्येकाने हिंदूसाठी जगावे व इतर समाजापेक्षा आपल्या समाजाला मोठे करावे असे आवाहन केले.

मिलींद एकबोटे म्हणाले,आजऱ्यातील हा जनआक्रोश मोर्चा नव्हे तर जनआदेश मोर्चा आहे. यापुढे हिंदू विरोधातील प्रकार थांबले नाहीत तर आम्ही परवानगी न घेता प्रतिकार करु. हिंदू शक्तीचा धाक अधिकारी व जनतेवर ठेवा.आजची परिस्थिती पहाता समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे. शिवाजी महाराजांनी व संभाजी राजेंनी स्वाभिमानीचे दर्शन घडविले आहे तेच आज हिंदूनी आचरणात आणले पाहिजे.हिंदुतेज प्रकट झाला पाहिजे.मातृशक्तिने कंबर कसली तर लव्हजिहाद सारखे प्रकार घडणार नाहीत.गाईंच्या संरक्षणासाठी कायदे आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही याच कत्तलखान्यातून लव्हजिहाद साठी २५ हजार कोटी रुपये दिले जात असल्याचे सांगितले.

राजश्री तिवारी (सोलापूर) म्हणाल्या, १९ प्रकारचे जिहाद आहेत त्यातील एक हा लव्हजिहाद आहे.धर्मांध शक्ती हे जाळे पसरवून हिंदूच्या मुलींना जाळ्यात ओढत आहेत.आज लाखो हिंदू तरुणी गायब आहेत.आपण बहुसंख्य असूनही आपणावर ही वेळ आली आहे याचे कारण म्हणजे आपल्या समाजात एकी नाही.त्याचाच फायदा ते घेत आहेत. मुलींना धर्माचे संस्कार द्या म्हणजे त्या फसणार नाहीत.वशीकरणामुळे फसगत होत आह त्यासाठी मुलींना उपासना शिकवा.पाश्चामत संस्कृतीमुळे धर्म च कळेनासे झाले आहे.हिंदूना पूरक असा कायदा व्हायला हवा.हिंदूराष्ट्रासाठी प्रयत्न व्हायला हवेत तरच गोहत्या, धर्मांतर सारखे प्रकार थांबतील. विष्णू पावसकर म्हणाले,येणाऱ्या काळात हे मोर्चे काढायचे बंद करा.कृतीत उतरुन गैरकृत्य करणाऱ्यांचे हातपाय काढा.आपण वेगवेगळ्या संघटना मध्ये विखुरलो आहोत मात्र सकल हिंदू समाज म्हणून वावरणे आवश्यक आहे.जो हिंदू तो आपला बंधू ही भावना निर्माण झाली पाहिजे.तीन खानांची पिक्चर्स बघायचे बंद करा. येणारा पठाण ही झळकू देऊ नका असे आवाहनही केले.आभार भाजप तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी मानले. यावेळी आदित्य शास्त्री, बंडादादा साळुंखे,बापू टोपले,जनार्दन टोपले, मुकुंद देसाई, संभाजी पाटील, युवराज पोवार,सुधीर देसाई,विष्णू केसरकर अरुण देसाई,महेश दळवी, राहुल नेवरेकर, बाळ केसरकर, संदीप पारळे यांच्यासह हजारो हिंदू बांधव उपस्थित होते. चौकटदर शनिवारी महाआरती हिंदूना एकत्र ठेवण्यासाठी दर शनिवारी रामतीर्थ येथे महाआरती करण्यात येणार आहे.यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नाथ देसाई यांनी केलेराष्ट्रवादी नव्हे राष्ट्रद्रोही कॉंग्रेस अजमल कसाबचा वकिल मजीद मेननला राज्यसभेचा खासदार बनवणारे हे राष्ट्रवादी नव्हे तरराष्ट्रद्रोही कॉंग्रेस व घुबडांची कॉंग्रेस असल्याची टिका एकबोटे तर राष्ट्रवादी ही मुघलांची सेना असुन त्याचे मौलवी जितेंद्र आव्हाड असल्याची टिका पावसकर यांनी केली.

🤙 8080365706