नारायण राणे पदरा पावटा ; संजय राऊत

मुंबई :नारायण राणे विरुद्ध संजय राऊत वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर आता याबाबातीत माझा संयम संपला आहे.नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना आता मी नागडाच करतो. त्यांची सगळी प्रकरणं उद्या बाहेर काढतो, असं वक्तव्य करत संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द वापरले. नारायण राणे पदरा पावटा आहे, याला कोण घाबरतो, असा सवाल राऊतांनी केला.

संजय राऊत मुंबईतून नाशिकच्या दौऱ्यासाठी आज निघाले. तत्पुर्वी त्यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.संजय राऊत म्हणाले, ‘ कालपर्यंत मी त्याला आदरार्थी संबोधत होतो. पण त्याने आरेतुरेची भाषा वापरली. सगळ्यांना आरे तुरे करतो. मुख्यमंत्र्यांना आरेतुरे… मोदींना आरेतुरे.. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, फडणवीस, अहमद पटेल, सोनिया गांधी, मोदी सगळ्यांना आरे तुरे करतो….किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंवर जे आरोप केले, ते उत्तर दिले का? १०० बोगस कंपन्या आणि इतर सगळी प्रकरणं बाहेर काढतो, असा इशारा राऊतांनी दिला.नारायण राणेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘ नारायण राणे, माझ्या नादाला लागू नकोस. कालपर्यंत गप्प होतो. आज तू मर्यादा सोडली आहेस. नामर्द माणूस आहेस. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं पळाला आहे..

🤙 8080365706