
ब्युटी टिप्स : केसांना तेल लावून मालिश करणं हे नेहमीचंच काम. पण बऱ्याचदा आपल्याकडून त्यातही चुक होते आणि मग त्याचा केसांवर चुकीचा परिणाम होत जातो.

ज्यादिवशी आपण केसांना तेल लावून मालिश करतो- केस धुतो, त्यादिवशी जरा जास्तच केस गळालेले आहेत असं दिसून येतं. असं नेमकं का होतं, तेल लावल्यानंतर, केस धुतल्यानंतर ते जास्त गळत असतील, तर नक्कीच आपल्याकडून काही तरी चुकतंय.
यात दिलेली सगळ्यात पहिली सूचना म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर लगेचच केस विंचरून गुंता काढू नका. तेल लावण्यापुर्वीच केसांतला गुंता काढून घ्या. आठवड्यातून फक्त १ किंवा २ वेळाच तेल लावा. त्यापेक्षा जास्त नको. मालीश केल्यानंतर केसांवर रात्रभर तेल ठेवू नका. २ ते ६ तासांचा वेळ पुरेसा असतो. त्यानंतर केस धुवून टाका.
