
मुंबई : बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी 2023-24 मधील क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. खरं तर आगामी पुरूष आशिया चषकाच्या स्पर्धेसाठी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटात असणार आहेत.

आशिया चषकात एकूण 13 साखळी सामने होणार असून 4 संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. लक्षणीय बाब म्हणजे सप्टेंबर 2023मध्ये आशिया चषकाचा थरार पार पडणार आहे.स्पर्धेच्या ठिकाणावरून वाद दरम्यान, या स्पर्धेसाठी एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. मात्र, स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु आगामी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे या आधीच स्पष्ट केले होते. याशिवाय ही स्पर्धा एखाद्या तटस्थ ठिकाणी आयोजित करावी अशी मागणी देखील बीसीसीआयने आशियाई संघटनेकडे केली होती.
