सौंदत्तीला जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात…

रामदुर्ग : बेळगाव तालुक्यातील रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर जवळ भीषण अपघात झालाय. यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी सौंदत्तीला निघालेल्या सहा भाविकांचा मृत्यू झालाय. तर १६ जण जखमी झालेत.

यामध्ये हनुमाव्वा म्यागाडी (२५), दीपा (३१), सविता (१७), सुप्रीता (११), मारुती (४२) आणि इंद्रव्वा (२४) (सर्वजण रा. हुलकुंद, ता. रामदुर्ग) अशी मृतांची नावे आहेत. रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावातील भाविक यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी सौंदत्तीला जात होते. दम्यान, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर जवळ त्यांचे वाहन एका वटवृक्षाला जोरात धडकून भीषण अपघात झालाय. यात सहा भाविक जागीच ठार झालेत. या घटनेने हुलकुंद गावच्या परिसरात शोककळा पसरलीय. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री गोविंदा कारजोळ यांनी केलीय.

🤙 8080365706