अजित पवारांचं वक्तव्य महाराष्ट्राला लाजवणारं; चंद्रशेखर बावनकुळे

नागपुर : भाजपकडून आज देखिल दादर, चेंबूर आणि नागपुरात आंदोलने करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.यावेळी बावनकुळे यांनी पवार यांच्यावर टीका करताना, त्यांनी केलेलं हे वक्तव्य महाराष्ट्राला लाजवणारं आहे. तर याबाबत अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असेही बावनकुळे म्हणाले.

इतकेच काय तर बावनकुळे यांनी अजित पवार हे धरणवीर आहेत असा टोलाही लगावला आहे.त्याचबरोबर औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी त्यांचा छळ केला. तेव्हा धर्माचं रक्षण करणारे संभाजीराजे होते. कितीही अत्याचार केला गेला तरी त्यांनी धर्म सोडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आता मुघलशाही स्वीकारली आहे. ती राष्ट्रवादी राहिली नाही, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

🤙 9921334545