
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात पाठविण्यात आली आहे.

ही पेटी गावखडी (ता. रत्नागिरी) येथील सहदेव पावसकर यांनी पुणे येथील बाजारात पाठविली असून, चार डझनाच्या या पेटीला २० हजार दर मिळणे त्यांना अपेक्षित आहे.अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे आंबा पीक दुष्टचक्रात सापडत चालले आहे. बदलत्या हवामानाचा फटका या पिकाला बसत असल्याने हा व्यवसाय खर्चिक बनला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर अगदी नोव्हेंबरपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने यावर्षी आंबा पीक उशिराने येण्याची शक्यता आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे. मात्र, मेहनतीच्या जोरावर पहिली आंबा पेटी बाजारात आणण्यात सहदेव पावसकर यशस्वी झाले आहेत.