
नागपूर : नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

एका अज्ञात व्यक्तीच्या फोन करून ही धमकी दिली.या प्रकरणात नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. यापूर्वीही देखील संघाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीनंतर पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली.एका अज्ञात व्यक्तींने फोन करून ही धमकी दिली. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहेनूपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर आली होती धमकी तत्कालीन भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही धमकी देण्यात आली होती. यानंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. राज मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी तामिळनाडू राज्यातून अटक केली होती.लखनौ आणि गोंडा या दोन RSS कार्यालयांना बॉम्बने स्फोटाची धमकी देण्यात आली होती. राज मोहम्मद याने फोनवरून उत्तर प्रदेशातील दोन ठिकाणांसह एकूण 6 ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. पोलिसांनी आरएसएस कार्यालयाची सुरक्षा वाढवली आहे.
