
नागपूर : मी किती मोठा आहे हे कामातून दाखवून देईन’, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टिकेला मार्मिक उत्तर दिले.

हिवाळी अधिवेशनामध्ये शंभुराजे देसाई यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली होती. ‘शंभुराज देसाईंसारख्या लहान व्यक्तीवर मी बोलत नाही’ असं म्हणत शरद पवारांनी शंभुराजे देसाई यांना टोला लगावला. आज साताऱ्यात बोलत असताना शंभुराजेंनी उत्तर दिलं. ‘मी वयानं तुमच्यापेक्षा लहान आहे मात्र काम मोठं करुन दाखवेन, असं सांगत पवार साहेबांच्या आशिर्वादानं आम्हाला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी राज्याचा समन्वयक मंत्री म्हणून काम करायची संधी मला मिळाली.त्यामुळे मी कामातून किती मोठा आहे हे दाखवून देईन’ असं शंभुराज देसाई म्हणाले.
