अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खान गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांच्या ताब्यात असून आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता शिझान खानने तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.वालीव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी शिझानच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. शिझानला त्याचं गुगल अकाऊंट आणि मेल आयडीचा पासवर्ड आठवत नाही आहे.

पण पोलिसांना त्याचं इमेल अकाऊंटदेखील तपासायचं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शिझानला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती.शिझानचे वकील म्हणाले,”गेल्या सात दिवसांपासून शिझान पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच त्याचा फोनदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. अशातच आता वसई न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे”.

🤙 8080365706