खडीसाखर खाण्याचे फायदे…

आरोग्य टिप्स : खडीसाखर आणणारे लोक कमीच असतात. चला तर मग जाणून घेऊयात खडीसाखर खाल्ल्याने आरोग्याच्या कोणत्या तक्रारी दूर होऊ शकतात.?

तोंडाला दुर्गंधी येत असल्यास

मुखदुर्गंधीचा त्रास अनेक जणांना असतो. दररोज २ वेळा स्वच्छ दात घासूनही तोंडाचा वास जात नाही. अशा लोकांना नियमितपणे खडीसाखर खाणे फायद्याचे ठरते. यासाठी जेवण झाल्यनंतर खडीसाखरेचा एक खडा आणि थोडीशी बडिशेप तोंडात टाका आणि चावून चावून खा. ताेंडाची दुर्गंधी कमी होईल.

खोकल्यावर गुणकारी

सतत कोरडा खोकला येण्याचा त्रास होत असेल तर अशावेळीही खडीसाखर चांगली उपयोगी पडते.ज्या लोकांना खास करून रात्री झोपल्यानंतर खोकल्याची उबळ येते, त्यांनी खोकला सुरू झाल्यावर खडीसाखरेचा एक तुकडा तोंडात ठेवून चघळावा. काही वेळातच खोकला कमी होईल. 

ॲसिडिटीसाठी उत्तम

खडीसाखर ही नॅचरल कुलंट म्हणजेच नैसर्गिक दृष्ट्या एक थंड असणारा पदार्थ म्हणून ओळखली जाते.त्यामुळे छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी असा त्रास ज्यांना होतो, त्यांनी खडीसाखरेचे पाणी प्यावे. ॲसिडिटी लगेचच कमी होईल. हा उपाय केल्यामुळे नॉशिया, मळमळ असा त्रासही कमी होतो.  

🤙 8080365706