
पाकिस्तान : पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मंदी येण्याची शक्यता असल्याची माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी दिली.

पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी गुंतवणूकदारांना आश्वासन दिले की, पाकिस्तान कोणाचेही कर्ज बुडवणार नाही.स्टॉक एक्सचेंजमध्ये पाकिस्तानच्या पहिल्या डेव्हलपमेंट रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट योजनेच्या लॉन्चिंग दरम्यान, अर्थमंत्र्यांनी एका कार्यक्रमात गुंतवणूकदारांना मंदीबाबत माहिती दिली.
“आम्ही कठीण स्थितीत आहोत. आमच्या मागील सरकारने 2016 मध्ये 24 अब्ज डॉलर्स परकीय चलनाचा साठा ठेवला होता. तो आता आमच्याकडे नाही. पण ही माझी चूक नाही. ही व्यवस्थेची चूक आहे,” असे दार म्हणाले.
