
कोल्हापूर: डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या (अभिमत विद्यापीठ) डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी या नव्या महाविद्यालयात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार या महाविद्यालयात वर्ष २०२२-२३ साठी डी. फार्मसी आणि बी. फार्मसी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी दिली.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठामार्फत सध्या मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज, स्कूल ऑफ हॉस्पिटलिटी, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस, सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्च आदी संस्था चालवल्या जातात. कोल्हापूर व आसपासच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्यावतीने कोल्हापुरातील कदमवाडी येथे फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) कडे विनंती अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार ‘पीसीआय’च्या समितीने 17 डिसेंबर रोजी प्रस्तावित महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. फार्मसी महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व सोयी- सुविधांची पडताळणी केल्यानंतर ‘पीसीआय’कडून 28 डिसेंबर रोजी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कदमवाडी या महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. नव्या फार्मसी महाविद्यालयात 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी डी. फार्मसी बी. फार्मसी या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार महाविद्यालयाकडून प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी औषध निर्माण शास्त्रात करिअर करण्यासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ येथे संपर्क साधावा असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी केले आहे. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, सीएसचआरओ श्रीलेखा साटम आदी उपस्थित होते.
