“जे जे बाळासाहेबांचे ते ते एकनाथ शिंदेंचे”; नितेश राणे

नागपूरः एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बहुतांश शिवसैनिक असल्याने जे जे बाळासाहेबांचे आहे, ते ते एकनाथ शिंदेंचे आहे, असं वक्तव्य भाजप नेता नितेश राणे यांनी केलंय.तर उद्धव ठाकरे यांचा गट आता वाटीभरच शिल्लक राहिलाय. त्यामुळे त्यांनी हट्ट सोडावा, अशा शब्दात त्यांना सुनावलं.

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर दावा ठोकण्यासाठी काल एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये तुफ्फान हाणामारी झाली. शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिंदे समर्थकांनी केला. यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, ‘ ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यालय आहे. त्यांचा अधिकार ते घेणार. जे बाळासाहेबाचे आहे ते सर्व शिंदेचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला त्यांनी हट्ट सोडला पाहिजे. जिथे जिथे बाळासाहेब बसायचे तिथे शिंदेचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेले जे कार्यालयात गेले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

🤙 9921334545