
मुंबई : पुढील वर्षी जगभरात आर्थिक मंदी येऊ शकते, आसा इशारा आय एम एफ आणि जागतिक बँकेकडून देण्यात आला आहे.

सप्टेंबरमध्ये जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटलं होतं की , जागतिक मंदीची काही चिन्हे आधीच प्राप्त होत आहेत. 1970 च्या मंदीनंतर सर्वात मोठ्या घसरणीला पोहोचली असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आले.
जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आर्थिक धोरण कडक केल्यामुळे महागाई नियंत्रित करण्यासाठी उत्पादन वाढवणे आणि पुरवठ्यातील अडथळे दूर करणे आवश्यक असल्याचेही जागतिक बँकेनं सांगितलं. आयएमएच्या ऑक्टोबरमधील अहवालानुसार, 2023 मध्ये जागितक अर्थव्यवस्था एक तृतीअंशपेक्षा जास्त प्रमाणात ढासळू शकते.