विधानपरिषदेत सीमावादावर बोलताना उद्धव ठाकरे आक्रमक

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये हजेरी लावली असून सीमावादावर बोलताना ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

बेळगाव निपाणी कारवार हा सीमाभाग केंद्र शासित करा अशी थेट मागणी यावेळी ठाकरेंनी सभागृहात केली.मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत परंतु ते दिल्लीत महाराष्ट्राची बाजू भक्कपणे मांडणार का ? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच ठराव.. ठराव म्हणजे नेमका कोणता ठराव आपण मांडणार आहोत. माझं मत आहे हा ठराव असाच असला पाहिजे की,जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित झालाच पाहिजे ही मागणी या ठरावाद्वारे आपण केली पाहिजे आणि केंद्राकडे पाठवली पाहिजे.

🤙 8080365706