शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता या आमदाराची आमदारकी होणार रद्द…

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पन्नास आमदार आहेत. सरकार टिकवण्यासाठी त्यांच्यासाठी एक-एक आमदार महत्वाचा आहे.अशातच आता शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांच्या गटातील एका आमदाराची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे.

चोपडा मतदार संघाच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. सोनवणे यांच्या जातप्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सोनवणेंची आमदारकी रद्द करण्यासाठी बिरसा फायटर्स (द ट्रायबल ऑर्गनायझेशन) मैदानात उतरले आहे.या संघटनेने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यपाल सोनवणेंबाबत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. बिरसा फायटर्स या संघटनेच्या राज्यभरातील एकूण 522 पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोनवणे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी केली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे.आमदार सोनवणे यांचे “टोकरे कोळी” अनुसूचित जमातीचे जात वधता प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार जिल्हा यांनी 9 फेब्रुवारी, 2022 रोजी अवैध ठरवले होते. त्यानंतर सोनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर रीट याचिकेतनू कमिटीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठाने 10 जून 2022 रोजी ही याचिका फेटाळून लावत प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला होता.

🤙 8080365706