
सोलापूर : एका शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर त्याची जमिनी तिसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर, अशा प्रकारचे वाद व तंटे सोडवण्यासाठी शासनाने ‘सलोखा’ योजनेचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या योजनेअंतर्गत भाऊबंदकीतील वर्षानुवर्षांचे वाद सुटणार आहेत. त्यासाठी अतिशय कमी खर्च व मुद्रांक शुल्कामध्ये जमिनीचे आदान-प्रधानाचे व्यवहार करता येणार आहेत.योजनेअंतर्गत मोठ्या गट नंबरातील वाटप होऊन अनेक पोटहिस्से झालेले असतात. परंतु पोटहिस्सा झालेला नसतो. अशावेळी प्रत्यक्ष स्थळपाहणी करूनच पंचनामा करण्यात येणार आहे. त्याचवेळी शेजारचा वहिवाटदार असलेल्या दोन सज्ञान खातेदारांची पंचनामा नोंदवहीवर स्वाक्षरी आवश्यक आहे. तलाठी आणि गावस्तरावर सलोखा योजनांसाठी आवश्यक त्या नमुन्यात नोंद करणे गरजेचे आहे. राज्यात सध्या कार्यान्वित एकत्रीकरण व तुकडेबंदी योजना राबविताना काही प्रकरणांत चुका झाल्या आहेत. त्त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सक्षम अधिकारी नेमण्याचा अभिप्राय वित्त विभागाने केला होता.
शासन यंत्रणेकडून झालेल्या चुकांमुळे जमिनीचा ताबा परस्परविरोधी शेतकऱ्यांकडे राहिला आहे. अशा शेतकऱ्यांना त्या त्या जमिनीचा ताबा देण्यासाठी अदलाबदल दस्तासाठी एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि १०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येईल.
