लग्नासाठी हट्ट धरला म्हणून प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण

मध्य प्रदेश:  रीवा जिल्ह्यातील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रेयसीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरला म्हणून प्रेयकराने चक्क प्रेयसीला बेदम मारहाण केली आहे.

प्रेयसीने लग्न कधी करणार असं विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. मारहाणीनंतर तरुणी बेशुद्ध पडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून प्रचंड चर्चेत आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, ही तरुणी 19 वर्षांची आहे. ही घटना बुधवारी घडल्याची माहिती आहे. आरोपी तरुणाला शांतता भंग केल्याच्या आरोपावरून आधी ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचा गुन्हा फार मोठा नव्हता, त्यामुळे त्याची नंतर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, तरुणीला मारहाण केल्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणावर भादंवि कलम 323 सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुण सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर मिळाल्यानंतर व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील मौगंज येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रियकर आणि प्रेयसी एका निर्जन ठिकाणी उभे असलेले दिसत आहे. या दोघांचा समोरून कोणीतरी व्यक्ती व्हिडीओ बनवत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओतील आरोपी तरुणाचं नाव पंकज असल्याची प्राथमिक माहिती आहे. तरुण व्हिडीओ बनवण्यास सांगत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. त्यानंतर प्रेयसी प्रियकराला लग्न करण्याबाबत विचारणा करत असल्याचं ऐकू येत आहे.

🤙 8080365706