सून निवडून आली; सासऱ्याची पपई बाग उध्वस्त केली….

औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निकाल विरोधात आल्याने अज्ञात व्यक्तींनी निवडून आलेल्या महिलेच्या सासऱ्याची पपईची बाग उध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात अंदाजे साडेतीनशे पपईचे झाड एका रात्रीतून कापण्यात आले आहेत. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत करोडी परिसरातील रामभाऊ धोंडिबा दवंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची करोडी शिवारातील गट क्रमांक 85 मध्ये 7 एकर शेतजमीन आहे. यातील एका एकर जमिनीमध्ये दवंडे यांनी आठ महिन्यांपूर्वी जवळजवळ 700 झाडांची पपईची बाग लावली होती. तर काबाडकष्ट करून त्यांनी पपईच्या झाडांची देखभाल केली. यामुळे या झाडांना मोठ्या प्रमाणात पपय्या लागल्या होत्या. मात्र अज्ञाताने रात्रीच्या सुमारास परिपक्व झालेली जवळजवळ साडेतीनशे पपईची झाडे तोडून टाकली. सकाळी रामभाऊ शेतात गेल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यात रामभाऊ दवंडे यांचे जवळपास दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले. तर त्यांच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🤙 8080365706