
कोल्हापूर : दिनांक 22 व 23 डिसेंबर 2022 रोजी वारणानगर येथे घेण्यात आलेल्या कोल्हापूर शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कु. गौतम धर्मेंद्र बगाडे ज्योतिर्लिंग स्कूल वडणगे इयत्ता नववी या विद्यार्थ्याने हॅमर थ्रो या क्रीडा प्रकारा मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला.

२८ डिसेंबर पासून सातारा येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी बगाडे याची निवड झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक एम एम पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच क्रीडा शिक्षक डॉ. अभय कुमार पाटील व प्रशिक्षक कुमे सर कवठेगुलंद यांचे मार्गदर्शन लाभले.
