
कागल : शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये विस हजार अनुदान रक्कम शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली त्या मंजुरी पत्राचे वाटप व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष सौ नवोदिता घाटगे यांच्या हस्ते लाभार्थ्याना करण्यात आले घाडगे.
राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयातील घरातील कमावत्या व्यक्तीचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे अनुदान दिले जाते. या लाभार्थ्यांचे गेले अडीच वर्षे हे प्रस्ताव प्रलंबित होते.याबाबत या लाभार्थ्यांनी घाटगे यांना लक्ष घालून मदत मिळणेसाठी पाठपुरावा करावा.असे साकडे घातले होते.
त्यानुसार घाटगे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले व या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. लवकरच या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील. यामध्ये गीतांजली भाले,( चिखली )उज्वला कांबळे (चिमगाव) लता पाटील (यमगे) यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांनी घाटगे यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी अरुण गुरव उपस्थित होते.
