
कागल : राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने देत आंदोलन केले.

यावेळी केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, प्रदेश सरचिटणीस नवीद मुश्रीफ, दलितमित्र बळवंतराव माने, तालुकाध्यक्ष विकास पाटील,शहराध्यक्ष संजय चितारी,ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते आदी उपस्थित होते.
