उमेदवारांचा विजय हा आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या विचारांचा विजय: ऋतुराज पाटील

कोल्हापूर: माझ्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 21 ग्रामपंचायतीपैकी 18 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी कॉग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला असून काँग्रेस नेते आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या विचारांचा हा विजय आहे. असे वक्तव्य आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.

काँग्रेसच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे नियोजन व मेहनतीचे हे यश आहे. या विजयाबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त विकासनिधी देण्याचा मी प्रयत्न केला असून मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. येथील मतदार काँग्रेस विचारांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नवनियुक्त सरपंच व सदस्यांचे अभिनंदन व मतदारांनी दिलेल्या भक्कम पाठबळाबद्दल पुन्हा एकदा आभार. येणाऱ्या काळात हे सर्व लोकनियुक्त सरपंच आणि नूतन सदस्य निश्चितपणे गावच्या विकासासाठी सकारात्मक पद्धतीने चांगले काम करतील याचा विश्वास वाटतो. असेही ते म्हणाले.

🤙 8080365706