संचेती हॉस्पिटल च्या विशेष सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर संपन्न..

कोल्हापूर : संचेती इन्टिट्यूट फार आॅर्थोपेडीक सेंटर व देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरच्या विशेष सहकार्याने आज बुधवार दि. 21 डिसेंबर 2022 रोजी मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले आहे.

हाडांचे आजार हा सर्वच कुटुंबात जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींना हाडांच्या अनेक समस्या उद्भवतात. वय वाढताना या समस्या वाढू नयेत, यासाठी लवकर काळजी घेतली, तर हे आजार टाळता येणे शक्य आहे. विशेषतः मनके व गुडघ्यांच्या समस्या असतात. हाडांच्या आजारांबाबत पुण्यातील संचेती हाॅस्पिटल केवळ राज्यातच नव्हे, तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे.

सध्या हॉस्पिटल च्या अत्याधुनिक अश्या नवीन ग्रीन ,स्मार्ट आणि हाय टेक १२ मजली इमारतीचे काम पूर्ण होत आलेले असून त्यामध्ये ३ मजले भूमीगत पार्किंग हे पार्किंग साठी राखीव आहेत , ऑर्थो,स्पाइन, न्युरोसर्जरी, रोबोटिक गुडघे आणि खुबा रोपण आणि रोबोटिक ओ आर्म स्पाइन सर्जरी यासह ८ हाय टेक ऑपरेशन थिएटर असणार आहेत .

संचेती इन्टिट्यूट फार आॅर्थोपेडीक सेंटर व देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या वतीने हे मोफत शिबीर आयोजन करण्यात आले होते. या वेळी संचेती हॉस्पिटलचे तज्ज्ञ डाॅक्टर्सची टीम तपासणी करणार आहे. विशेषतः सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. कैलास पाटील, हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यामध्ये मोफत बीएमडी (हाडांचा ठिसूळपणा) ही तपासणी केलीली आहे . ३०० हुन अधिक लोकांनी या शिबिरात नोंदणी केलेली आहे.डॉ. पराग संचेती हे संचेती हॉस्पिटलचे संचालक असून, जागतिक पातळीचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. सांधेरोपणाच्या विकारांबाबत त्यांनी जागतिक पातळीवर संशोधन केले आहे. सांधेरोपणाची हजारो शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत.डॉ. कैलास पाटील कोल्हापूरचा सुपुत्र आणि संचेती हॉस्पिटल पुणे येथील गुडघा रोग तज्ञ असं आहे . माझे ट्रेनिंग गुडघ्यामध्ये गुडघ्यांच्या विकृतीमुळे गुडघ्यांच्या प्रॉब्लेम्स बद्दल झालेला आहे ते बेल्जियम, जर्मनी,अमेरिका येथे झालेल आहे आणि आता मी पुण्यामधील सुप्रसिद्ध संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशन येथे एक गुडघा विकार तज्ञ म्हणून कार्यरत आहे . मी नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा सांधा प्रत्यारोपण आणि नी स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे दुर्बिणी द्वारे गुडघ्यातील लिगामेंट्स किंवा स्नायूंचे ऑपरेशन करण्यामध्ये महारत हासील केलेली आहे . आज पर्यंत माझ्या द्वारे साधारणतः 6000 च्या वरती शस्त्रक्रिया झालेले आहेत आणि त्या सगळ्या सक्सेसफुल झालेल्या आहेत साधारणतः 90 ते 95 टक्के सक्सेस रेट आहे याच्यासाठी मी माझे गुरु डॉ. के एच संचेती आणि डॉ. पराग संचेती यांचे खूप आभार मानतो याच्याच बरोबर आमच्या येथील बरेच सर्जन व शस्त्रक्रिया करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांचेही आभार मानतो ज्यांनी मला बेसिक ज्ञान दिल ऑर्थोपेडिक बद्दल . मी कराड, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर येथे ओपीडी करत असतो आणि महिन्यातून किमान एक ते दोन वेळा मी या भागांमध्ये सेवा देतो त्याच्यामध्ये मी गुडघ्यांमध्ये विकृती किंवा गुडघ्यांच्या आजारांबद्दल निदान व शस्त्रक्रिया बद्दल सल्ले दिले जातात आणि त्याचे पुढील उपचार केले जातात.

🤙 8080365706