राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेची प्रगतीपथावर वाटचाल :चेअरमन – शशिकांत तिवले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि शाहू गव्हमेंट सव्हेंट्स को-ऑप लि., कोल्हापूर या बँकेची पंचवार्षिक निवडणूक नंतर नव्या संचालक मंडळाचा एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. एक वर्षाच्या कालावधीमध्ये संचालक मंडळाने बदलत्या बँकींग क्षेत्रातील स्पर्धेच्या युगात रिझर्व्ह बँकेच्या बदलत्या निर्बंधाचा वेळोवेळी अवलंब करीत सभासदाभिमुख कारभार करीत असून राजर्षि शाहू गव्हमेंट सव्र्हेंटस को-ऑप बँकेची वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरु आहे. एक वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा बँकेचे चेअरमन शशिकांत तिवले यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला.

नव्या संचालक मंडळाने बँकेचा कार्यभार हाती घेताच जाहिर वचननाम्यामध्ये सभासदांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणेचे अनुषंगाने घेतलेल्या निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत सांगितले. सभासदांना देणेत येणाऱ्या सभासदांना वितरीत करणेत येणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवून रु. 15 लाखावरुन एकत्रित कर्जमर्यादा रु. 18 लाख इतकी करणेत आली. त्याचबरोबर यापूर्वी पगारतारण कर्जास जास्तीत जास्त 7 वर्षाची कर्जाची मुदत देणेत येत होती. त्यामध्ये वाढ करुन कर्जाची मुदत 10 वर्षापर्यंत वाढविणेत आली. त्याचबरोबर आकस्मिक कर्जाची मर्यादा वाढवून रु. 1 लाखावरुन कर्जमर्यादा रु. 1.50 लाख इतकी करणेत आली.राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने व कै.नामदार भास्करराव जाधव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली असलेने राजर्षि शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त बँकेमार्फत सभासद, ठेवीदार व ग्राहक यांचे साठी “राजर्षि शाहू कृतज्ञता पर्व ठेव ” योजना सुरु करणेत आली. सदर ठेवीस “7.50%” इतक्या भरघोस व्याजदराचा लाभ देणेत आला. शासकीय लेखापरिक्षक यांनी बँकेच्या दिनांक 31 मार्च 2022 रोजीचा सांपत्तिक स्थितीचे लेखापरिक्षण करुन बँकेस ” अ” वर्ग दिला असून बँकेने यामध्ये सातत्य राखले आहे. बँकेचे कामकाज हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे धोरणास अनुसरुन व मार्गदर्शक तत्वानुसारः चालते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी आर्थिक दृष्ट्या सशक्त आणि उत्कृष्ट व्यवस्थापन असणाऱ्या नागरी सहकारी बँकांच्या वर्गीकरणासाठी 7 निकष प्रमाणित केले आहेत. जी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी प्रमाणित केलेल्या 7 निकषांची पूर्तता करेल ती बँक रिझर्व्ह बँकेचे दृष्टीने आदर्श बँक म्हणून समजणेत येते. सध्या बँकेस रिझर्व्ह बँकेचे मानांकन ” ग्रेड-I” प्राप्त आहे.आज अभिमानाने नमूद करावेसे वाटते की, आमच्या राजर्षि शाहू गव्हर्मेंट सव्हटस को-ऑप. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 7 निकष पूर्ण केले असून आमची बँक ” आदर्श बँक ” म्हणून गणली जात आहे. बँकेने CBS ( कोअर बँकींग कार्यप्रणाली ) चा अवलंब यापूर्वीच केला असून भविष्यातील बँकींग क्षेत्रातील डिजीटलायझेशनचा विचार करुन व्यावसायिक बँकांचे धर्तीवर UPI व IMPS तंत्रज्ञानाचा अवलंब करणार असून बँकेमार्फत आधुनिक सेवा देणार आहे. बँकेने रु. 200 कोटींच्या ठेवीचा टप्पा पार केला असून आजमितीस बँकेकडे रु.215 कोटीच्या ठेवी आहेत. पंचवार्षिक निवडणुकीमधील जाहिर वचननामा मध्ये दिलेल्या वचनांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करणेत येणार आहे. यासाठी सर्व संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे असे बँकेचे गटनेते रविंद्र पंदारे यांनी सांगितले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष रमेश घाटगे, संचालक मधुकर पाटील ( एम.एस् ), अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलासराव कुरणे, सदानंद घाटगे, अजित पाटील, संचालिका सौ. हेमा पाटील, श्रीमती. मनुजा रेणके, संचालक संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, तज्ञ संचालक दिलीप मिरजे रामदास कोकीतकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706