उद्या ठरणार ‘गुलाल’ कोणाचा..

कोल्हापूर (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवार दि. २० रोजी होणार आहे.प्रशासनाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून १८ टेबलवर १६ फेरीमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या मतमोजणी ची सुरुवात सकाळी आठ वाजल्यापासून कसबा बावडा येथील रमनमळ्यातील बहुद्देशीय हॉल येथे होणार आहे.

या मतमोजणीच्या पहिल्या फेरीचे निकाल साडेआठ वाजता तर प्रत्येक फेरीचा निकाल दर अर्ध्या तासाने घोषित होऊ शकतो. दुपारपर्यंत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे निकाल स्पष्ट होतील.जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतीच्या मतमोजणी फेऱ्या पुढीलप्रमाणे..

पहिली फेरी : , कावणे, वडणगे,सादळे-मादळेदुसरी फेरी : हिरवडे खालसा,वरणगे, नेर्ली, विकासवाडी. प्रयाग चिखली, तिसरी फेरी : दिंडनेर्ली, कसबा बीड,हसुर दुमाला, परिते,चौथी फेरी : , सडोली दुमाला, पासार्डे, चिंचवडे तर्फे कळे.सोनाळी, आरळे, सावर्डे दुमालापाचवी फेरी : पाडळी बुद्रुक, गांधीनगर, हिरवडे दुमाला.सहावी फेरी : सरनोबतवाडी, वळीवडे, भुये.सातवी फेरी : कणेरीवाडी, चुये,उजळाईवाडी, आठवी फेरी : मोरेवाडी, कांडगांव, दऱ्याचे वडगांव, वड्डवाडी.नववी फेरी : पाचगांव.दहावी फेरी : कणेरी, बोलोली.गोकुळ शिरगांव, शिपेकरवाडी- दुर्गुळवाडी.अकरावी फेरी : सांगरुळ निगवे खालसा.बारावी फेरी : वसगडे, कळंबे तर्फे ठाणे, कांचनवाडी.तेरावी फेरी : शिंगणापूर, वाकरे,.कंदलगांव, हणबरवाडीचौदावी फेरी : उचगांव प्रभाग क्र. १ ते ४, मांडरे.पंधरावी फेरी : उचगांव प्रभाग क्र. ५ ते ६ म्हाळुंगे, नंदवाळ, दोनवडे.सोळावी फेरी : शेळकेवाडी, आंबेवाडी.नागांव, जैताळ,

🤙 9921334545