पन्हाळा पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार ; अधिकाऱ्याने केली महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

पन्हाळा : पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून पन्हाळा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पीडित महिला कर्मचाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याविरोधात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे गुरुवारी (दि. १५) तक्रार अर्ज दिला आहे. गेल्या चार वर्षांपासून पन्हाळा पोलिस ठाण्यात या महिला कर्मचारी कार्यरत असून, महिलेने गुरुवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. असहायतेचा गैरफायदा घेऊन अधिकारी त्रास देतात. विनाकारण लगट करतात. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने रोज सकाळी तोकड्या चड्डीत ते पोलिस ठाण्यात येऊन अनावश्यक प्रश्न विचारतात. महिला कर्मचाऱ्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करतात. पीडित महिलेकडे त्याने वारंवार शरीरसुखाची मागणी केली. मात्र, संबंधित महिला कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याची मागणी धुडकावून लावल्याने शारीरिक, मानसिक त्रास दिला जात आहे.पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, तातडीने चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. अधिकाऱ्यानेच महिला कर्मचान्याशी गैरवर्तन केल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

🤙 8080365706