हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा ताफा तैनात….

मुंबई : आंगामी हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपराजधानीत दाखल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तालयातून बंदोबस्ताचे नियोजन सुरू असून पोलीस वाहनांचा मोठा ताफा शहरात संरक्षण व नियंत्रणासाठी सज्ज झाला आहे.हिवाळी अधिवेशनास १९ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी बाहेर जिल्ह्यातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ताफे नागपुरात दाखल झाले आहेत. शुक्रवारपासून सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होणार आहेत. पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्ताचे नियोजन केले असून शहरात अधिवेशनासाठी निवासस्थानापासून ते जेवणापर्यंतची तयारी केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बंदोबस्तासाठी राज्यभरातून शहरात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणे सुरू केले आहे. हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी ७ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) सात तुकड्यांचा समावेश आहे. आधुनिक सुविधा असलेली ५ सुसज्ज अशी दक्षता वाहने, एक हजार होमगार्ड, १२ बॉम्ब शोधक-नाशक पथकांसह विशेष कमांडो सुरक्षेसाठी सज्ज आहेत.

🤙 8080365706