चंद्रकांत पाटलांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फेसबुकवरील सचिन १४१४ नावाच्या खातेधारकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर तसेच शिवीगाळ करणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याप्रकरणी सनी किरण लांडे (वय ३२, रा. जयभवानीनगर, पौड रस्ता) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

🤙 8080365706