मूठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण; उदयनराजे भोसले

सातारा : काही मूठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झालं. याचमुळं प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक, प्राध्यापक यांच्या आंदोलनास भेट दिली. यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील कारभारावर टीकेची झोड उठवली. उदयनराजे म्हणाले, ”कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेची घटना तयार करत असताना संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असावा, असं लिहिलं होतं. मात्र, काही मूठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झालं. याचमुळे प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे, असा आरोप उदयनराजेंनी केली.रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत राज घराण्याचा मोठा वाटा आहे. मात्र, आता ‘रयत’च्या संचालक मंडळाच्या बॉडीत योगदान नसणाऱ्यांना सुद्धा घेतलं गेलंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

🤙 8080365706