
दोनवडे : वाकरे (ता. करवीर) येथील शुभम एकनाथ पवार (वय २४) याने शेतामध्ये जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
शुभम हा गुजरीमध्ये कामास होता. दुकान बंद करून गावी येताना वाकरे येथील शेतात विषारी औषध प्राशन केले. सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
