
आरोग्य टिप्स : प्राचीन संस्कृतींमध्ये वैद्यकीय उपाय म्हणून लसूण वापरला जात असे. लसणाचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. लसूण खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात ते जाणून घेऊया.
१. सर्दी, खोकलालसूण खाल्ल्याने इम्युनिटी वाढते, त्यामुळे खोकला आणि सर्दी होत नाही. एका अभ्यासानुसार, लसूण खाल्ल्याने आजारी पडण्याचा धोका ६१ टक्क्यांनी कमी होतो.
२. कोलेस्ट्रॉल, हाय ब्लडप्रेशररक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे ब्लड प्रेशर वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका जास्त असतो. लसूण खाल्ल्याने हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करता येऊ शकते.
३. अल्झायमर आणि डिमेंशियाफ्री-रॅडिकल्समुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव मेंदूचे वय वाढवते, ज्यामुळे अल्झायमर आणि डिमेंशियासारखे आजार होतात. लसणात असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.
४. अशक्तपणा – थकवाखेळाडू आणि क्रीडापटूंसाठी लसूण फायदेशीर आहे. तो खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
५. मजबूत हाडेलसणामुळे हाडे मजबूत होतात, त्यामुळे म्हातारपणात हाडे कमकुवत होत नाहीत. हे खाल्ल्याने महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोन्स वाढतात.
६. डिटॉक्सलसणात असलेले सल्फर कंपाउंड लेडसारख्या धातूने होणारे नुकसान दूर करते, तो शरीरातील सर्व घाण साफ करतो.
७. सांधे किंवा स्नायूचे दुखणेसांधे किंवा स्नायूंमध्ये वारंवार दुखत असेल तर लसूण जरुर घ्या. ही समस्या अनेकदा शरीरात इंफ्लामेशन वाढल्याने उद्भवते. लसणात सूज कमी करणारे गुणधर्म असतात. हिवाळ्यात लसणाचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते.
