“रॉयल ०९ टूरीस्ट बिझनेस हब” हा प्रकल्प कोल्हापूरच्या वैभवात भर टाकेल आम. – सतेज पाटील

कोल्हापूर: स्टेशनरोड वरील व एस.टी. स्टैंड परीसरातील जुन्या व सुप्रसिध्द अशा हॉटेल टूरीस्टच्या जागेत आता मे. सुरज इस्टेट डेव्हलपर्स यांचे तर्फे “रॉयल ०९ टूरीस्ट बिझनेस हब” या भव्य व आधूनिक व्यावसायिक प्रकल्पाचा शुभारंभ आज सोमवारी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते व संजय घोडावत, डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रमुख उपस्थिीत संपन्न झाला.

या वेळी बोलताना आमदार सतेज पाटील व उद्योगपती संजय घोडावत यांनी आपल्या मनोगता मध्ये प्रकल्पाबद्दल प्रशंशा करत या प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या वैभवात नक्कीच भर टाकेल असे गौरव उद्गार काढले.

गेली पासष्ट वर्षापासून आदरातिथ्य, पर्यटन, व्यापार, उद्योग या क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या या ठिकाणी आता पश्चिम महाराष्ट्रातील एक भव्य व्यावसायिक प्रकल्प उभा रहात आहे. अत्यंत मध्यवर्ती व प्रतिष्ठित अशा या ठिकाणी सर्व सुविधांनी सज्ज असणारा “रॉयल – ०९ टूरीस्ट बिझनेस हब” मध्ये आकर्षक वास्तुरचना, प्रशस्त लॉबी व ॲट्रीयम, दुमजली पार्किंग व्यवसायासाठी उत्तम सुविधा व कार्पोरेट क्षेत्रासाठीचे प्रभावशाली वातावरण असलेने ही बहुमजली वास्तु कोल्हापूरच्या उद्योग व्यवसायाला नवीन संधी देणारी ठरेल.

या वेळी सुरज इस्टेट डेव्हलपर्सचे भागीदार आनंद माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर राजीव परीख यांनी प्रकल्पाची माहीती प्रेझेंटेशनद्वारे दिली. यावेळी रिंगरोडवरील रहीवासी प्रकल्प ‘रॉयल ड्रिमलँड’, आयकॉन इंडस्ट्रीयल पार्क हा अंबप मधील इंडस्ट्रीयल प्लॉटींगच्या प्रकल्प व नवीन सुरू होणारा प्रिमीयम फ्लॅट प्रकल्प ‘रॉयल प्लॅनेट’ यांचे देखील सादरीकरण करणेत आले. तसेच भागीदार चेतन वसा यांनी आभार मानले.यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील व उद्योगपती संजय घोडावत यांनी आपल्या मनोगतात प्रकल्पाबद्दल प्रशंशा करत या प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या वैभवा त भर पडणार आहे असे गौरवउदगार काढले.या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीय व अॅग्रीकल्चर चे अध्यक्ष ललीत गांधी व क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी यांनी देखील नव्या प्रकल्पाबद्दल गौरव उद्गार काढले. यावेळी प्रकल्पाचे जागामालक व हॉटेल टूरीस्ट प्रा. लि. चे चेअरमन आर.ए. उर्फ बाळ पाटणकर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष राम पुरोहीत व उद्योग क्षेत्रातून कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनचे सचीन मेनन, हर्षद दलाल, सचीन शिरगांवकर, उद्योगपती, कांतीलाल चोरडीया, सचिन झवंर, शंकर दुल्हानी, बांधकाम क्षेत्रातील प्रविणसिंह घाटगे, अर्जुन माने तसेच बांधकाम क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

🤙 8080365706