
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच भागात रात्रीपासून सकाळपर्यंत पावसाच्या हलक्या स्वरुपाचा सरी पडत आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा , काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.

अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदोस चक्रीवादळामुळे कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, काजूला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त आहे. त्यातच यंदा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. तर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे फवारणीवर होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा ताळमेळ देखील बसत नाही. या स्थितीमुळं आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
