अग्निविर भारती मेळाव्यात कोल्हापुरात ९५ हजार उमेदवारांची चाचणी

कोल्हापूर : गेल्या 22 दिवसांपासून सुरु असलेल्या अग्निवीर भरती मेळाव्यात कोल्हापुरात 95 हजार उमेदवारांची चाचणी करण्यात आली.

राज्यतील विविद भागांसह कर्नाटक आणि गोव्यातील तरुणांनी हजेरी लावली. शारीरिक, वैद्यकीय चाचणीनंतर पात्र तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी दिली जाणार आहे. आज भरतीचा अखेरचा दिवस आहे. केंद्र सरकारने अग्निवीर भरतीची योजना कार्यान्वित केल्यानंतर पहिल्यांदाच भरती प्रक्रिया होत आहे. 21 नोव्हेंबरपासून भरतीला सुरुवात झाली.या भरतीसाठी 98 हजार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. राज्यातील सर्व भागांतून तरुण आले होते. दररोज पाच ते सहा हजार तरुणांची शारीरिक चाचणी होत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी केली जात होती. आता वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल. निवड झालेल्यांना संपर्क करून त्यांना याबाबतच्या पुढील सूचना देण्यात येणार आहेत.

🤙 8080365706