
मुंबई: मधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

याचसंदर्भातील बातमीची कात्रणं शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना लक्ष्य केलं आहे. जुलै महिन्यापासून शिंदेंबरोबर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना व्हा दर्जाची सुरक्षा पुरवण्यासाठी निर्भया निधीअंतर्गत मिळालेल्या पैशांमधून विकत घेतलेली वाहने वापरील जात आहेत.जून महिन्यात मुंबई पोलिसांनी २२० बुलेरो, ३५ एर्टीगा, ३१३ पल्सर बाईक्स आणि २०० अॅक्टीव्हा गाड्या विकत घेतल्या. निर्भया फंडाअंतर्गत मिळालेल्या ३० कोटी रुपयांमधून या गाड्या खरेदी करण्यात आल्या. २०१३ मध्ये केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी ही योजना सुरु केली असून त्याअंतर्गतच पोलीस दलाला वाहनखरेदीसाठी हा ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला. या निधीमधून देण्यात आलेल्या गाड्यांची नवी तुकडी जुलै महिन्यामध्ये मुंबई पोलीस दलात दाखल झाली.
