बहारदार लावण्यांची मैफल संपली, सुलोचना चव्हाण यांना उद्धव ठाकरे यांची आदरांजली

मुंबई : सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने लावणी गायकीतला तडफदार आवाज हरपला. बहारदार लावण्यांची मैफल संपली. महाराष्ट्राच्या चित्रपट व सांस्कृतिक जगताची हानी झाली,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुलोचनाबाईंचा तडफदार आवाज जणू ‘लावणी’ गायनासाठीच ईश्वराने निर्माण केला इतक्या त्या तमाशाप्रधान चित्रपटांशी एकरूप झाल्या. ‘आई मला नेसव शालू नवा, फड सांभाळ तुऱ्याला गं आला, कसं काय पाटील बरं हाय का…’ अशा शेकडो लावण्या त्यांच्या आवाजाने अजरामर केल्या. अभंग गावेत अशा तन्मयतेने व साधेपणाने त्या लावणी गात असत. ‘पद्मश्री’, संगीत नाटक अकादमीसह पुरस्कार त्यांना मिळाले. सुलोचनाबाई म्हणजे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राच्या काsंदणातील तेजस्वी हिरा होत्या. तो हिरा आज निखळला आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

🤙 8080365706