
साळवण : गगनबावडा तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. तिसंगीतील ज्योतिर्लिंग पँनेलचा प्रचार शुभारंभ नुकताच पार पडला.

पँनेलचे नेते वजिल्हा परिषदेचे सदस्य डा्ँ.भगवान पाटील यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांचे उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला. या वेळी अनेक उपस्थिती तानी बोलतांना पँनेलचे सर्व उमेदवार विजयी करण्याचा निर्धार या वेळी केला.

पँनेलचे नेते भगवान पाटील यांनी बोलतांना आपल्या पँनेलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला . या वेळी सरपंच पदाचे उमेदवार संजय गणपती पाटील,गणू भाउ पाटील, लहु रामा पाटील, मधुकर पोतदार,आर.डी. वाघरे सर, पांडुरंग खाडे,सागर प्रकाश पाटील,बाबासाहेब भोसले,अमिन फकिर,हिंदुराव साळोखे यांच्या सह सेवा संस्था ,दुध संस्था, बचेत गटाच्या महिला उपस्थित होत्या.