
गुडाळ: गुडाळ परिसरातील हजारो दत्तभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वाकेश्वर दत्त मंदिरामध्ये उत्साही आणि धार्मिक वातावरणात दत्त जयंतीचा भव्य सोहळा संपन्न झाला.

मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभरात हजारो भक्तांनी श्री मूर्तीचे दर्शन घेतले. गुडाळेश्वर विकास संस्थेचे संचालक आशिष पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी माजी उपसरपंच सौ अश्विनी पाटील यांच्या शुभहस्ते दत्त मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. याप्रसंगी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ गुडाळ आणि परिसरातील दहा हजाराहून अधिक भाविकांनी घेतला. वाकेश्वर दत्त मंदिराचे परमपूज्य नारायण महाराज, ट्रस्टचे डॉ. मन्मत घारोटे, चंद्रकांत बन्ने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दत्त जयंती सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते.