पंढरपूर काॅरिडाॅर रद्दच्या मागणीला अमोल मिटकरींचा पाठिंबा

पंढरपूर : वाराणसी धर्तीवर नियोजित तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर रद्द व्हावा, ही मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे विकास आराखड्यावरून पुन्हा एकदा पंढरपूरचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्थानिकांच्या पंढरपूर काॅरिडाॅर रद्दच्या मागणीला पाठिंबा दिला.

हिवाळी अधिवेशनात पंढरपूरच्या कॅरिडॉरचा मुद्दा मांडणार असल्याचे मिटकरी यांनी सांगितली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी म्हणाले, पंढरपूर आणि काशीची तुलना होऊ शकत नाही त्यामुळे काशीच्या धर्तीवर विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर करण्याचा निर्णय सरकारने रद्द करावा काॅरिडाॅरमुळे अनेक मंदिरे मठ पाडले जाणार आहेत त्यामुळे पंढरपूरचे वैभव नष्ट होणार आहे याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी मिटकरी यांनी केली.

🤙 9921334545