कशी आहे पंढरपूर कॉरिडॉरची योजना?

पंढरपूर: पंढरपूर कॉरिडॉरसाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विकासकामात पुरातत्त्व खात्याच्या मदतीने विठ्ठल मंदिराची दुरुस्ती, नवे दर्शन मंडप, स्कायवॉक, नऊ वाहनतळे, रस्ते रुंदीकरण आदींचा समावेश आहे.

प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, पालखीतळ, वाहनतळ, उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. प्रदक्षिणा मार्ग ते मंदिर परिसरात २१ रस्ते तर पंढरपूर शहरात १७ नवीन रस्ते करण्यात येणार आहेत. यामध्ये काही रस्त्यांची रुंदी वाढवण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 72 हजार स्क्वेअर फुट तर दुसऱ्या टप्प्यात 39 हजार स्क्वेअर फुट जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील जवळपास तीन एकर रहिवासी आणि व्यापारी जागा या प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरमध्ये जाणार आहे. परंतु, या कॉरिडॉरमुळे सातशे कुटुंब बाधित होणार आहेत. शिवाय व्यापार्‍यांच्या समोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून वारकरी संप्रदायानेही या कॉरिडॉरला विरोध करून मंदिरासमोर भजन आंदोलन केले आहे.

🤙 9921334545