महाविकास आघाडीच आज होणार आंदोलन…

कोल्हापूर : सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वर सुरू झालेल्या अन्याया विरोधात, महाविकास आघाडीने आज आंदोलनाची हाक दिली आहे.

राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळी सकाळी अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. आंदोलनाच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या तैनात करण्यात आला आहे.

शहर डी वाय एस पी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे . महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

काही दिवसापूर्वी मराठी भाषिक वाहनावर सीमा भागात हल्ले झाल्याची घटना घडली होती. सीमा भागातील मराठी भाषिक बांधवांच्यावर कर्नाटक सरकारकडून नेहमीच अन्याय आणि दडपशाही सुरू असते. याचा निषेध या आंदोलनातून केला जाणार आहे . या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषिक बांधव देखील सहभागी होणार असल्याने, महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात काय भूमिका मांडणार याकडे आता लक्ष लागून आहे.

🤙 8080365706