
औरंगाबाद : शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली असून, पिक बहरलेले आहे.मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनमध्ये बोलली जात आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.

औरंगाबाद पैठण, सिल्लोड ,फुलंब्री, सोयगाव, कन्नड, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील परिसरात यंदा परतीच्या पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे अनेकांचे हातात आलेले खरीप पिक पूर्णपणे वाया गेले आहे. यामुळे मराठवाड्यातील पाणीपातळी वाढली असून, विहिरींत पाणीसाठा देखील वाढलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीची तयारी केली. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कपाशीची झाडे उपटून टाकली. त्या कपाशीच्या शेतामध्ये मका, ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला, आदी पिकांचा पेरा घेतला. पण आता ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
