गगनबावडा तालुक्यातील २१ पैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध तर एकून ६ ठिकाणी सरपंच बिनविरोध…

गगनबावडा : दिगंबर म्हाळुंगेकर

गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतचा निवडणूक प्रोग्राम जाहीर झाला. त्यानंतर आज माघारीचा दिवस पार पाडला यामध्ये तालुक्यातील कोदे या ग्रामपंचायतीमधुन सहकारमहर्षी मा. विलास भिकाजी पाटील यांच्या पत्नी सौ.शोभा विलास पाटील या सरपंच पदासाठी बिनविरोध तर मार्गेवाडी, अंदुर अशा एकून ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर असळज, वेसर्डे व शेनवडे येथे लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले.

तालुक्यातील साळवण , शेळोशी येथे सदस्य बिनविरोध तर सरपंच पदासाठी मोठी रस्सिखेच होणार आहे. शेनवडे व वेसर्डे या गावातील सरपंच व ६ सदस्य बिनविरोध झाले आहेत तर एका सदस्य पदासाठी निवडणूक लागणार आहे.

आज दिवसभरात माघारीसाठी अनेकांची मनधरणी चालू होती. अनेक ठिकाणी ग्रुप करून माघारी साठी आपापसात ठरवून माघार घेत होते .माघारी सत्रानंतर ३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर १८ ग्रामपंचायती साठी निवडणूक होणार असून यामध्ये ८९ सदस्य तर ६ सरपंच बिनविरोध झाले. यावेळी दिवसभरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही . माघारीचा दिवस शांततेत पार पडला .

🤙 8080365706