आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे: कुलगुरु प्रा. डॉ. टी. मंगलेश्वरन

कोल्हापूर : कोविड महासाथ आणि तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल यामुळे जागतिक व्यापार क्षेत्रावर होत असलेल्या परिणामांची त्यांनी चर्चा केली. बदलत्या काळानुसार उद्योग क्षेत्रातही कंपन्यांच्या संरचनेत बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले. कंपन्यांचे व्यवस्थापन अधिकाधिक आधुनिक लवचिक क्षमता आणि सांघिक भावनेला महत्व देणारे, विविधता अंगिकारणारे बनत चालले आहे असं ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करू शकणाऱ्या कंपन्या यापुढील ताव धरू शकतील असं श्रीलंकेतील बाबूनीया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. टी. मंगलेश्वरन यांनी सांगितले.

मानवी आणि अन्य संसाधनांचा अपव्यय टाळून त्यांचा कौशल्याने वापर करण्यावर भविष्यात उद्योगांची यशस्वीता अवलंबून असेल असे त्यांनी सांगितले. सायबर महाविद्यालयातर्फे “भविष्यातील जागतिक व्यवसाय आणि तंत्रज्ञान यांच्या समोरील आव्हाने” या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना श्रीलंकेतील बाबूनीया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. टी. मंगलेश्वरन यांनी वरील उद्गार काढले. आपल्या बीज भाषणामध्ये बोलताना त्यांनी श्रीलंकेमधील सध्याची शैक्षणिक स्थिती याविषयी मांडणी करतांना असे सांगितले की, श्रीलंकेमध्ये असणाऱ्या एकूण १७ विद्यापीठांमार्फत उच्च शिक्षण दिले जात असून त्याप्रमाणात खाजगी शिक्षण संस्थामध्ये शिकणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले. सध्या सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असून काहीवेळा हे तंत्रज्ञान आत्मसात न केल्यास विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. या सर्वांचा मिश्र स्वरूपात परिणाम दिसत असून यामध्ये सकारात्मक दिशेला जाण्यासाठी उपाययोजना राबवण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले.सदर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये कार्यरत असणारे क्लिनिकल सायकॉलॉजी चे प्रोफेसर डॉ. रोनाल्ड ओ डॉनेल यांनी कोविड चा प्रभाव बऱ्यापैकी संपत असल्यासारखे वाटत असले तरी त्यासाजे दूरगामी परिणाम जसे की बिघडलेले मानसिक आरोगी, वाढलेली व्यसनाधीनता, संयमाचा अभाव इ. गोष्टींमजले एकंदरीतच सामाजिक अस्थिरता वाढीस लागलेली दिसते, यासाठी शासकीय व निमशासकीय आणि एकंदरीतच विविध इतर संस्थांमार्फत या विषयांवर नियोजनपुर्वक काम होणे गरजेचे असल्याचे सांगून प्राधान्यक्रमाने प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते व संबंधी समाज कार्य महाविद्यालये यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. पुढील सत्रात हर्गेसिया विद्यापीठ सोमालि लँड आफ्रिका येथील डॉ. मोहम्मद युसूफ मुसे यांनी ऑनलाईन पद्धतीच्या सादरीकरणात हर्गेसिया विद्यापीठांमार्फत विविध नाविन्य पूर्ण उपक्रम राबविले जातअसून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा उपक्रमशीलतेवरती भर असतो. याठिकाणी देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये वाढ होत असून यामाध्यमातून आधुनिकीकरणाकडे वाटचाल होत असल्याचे सांगितले. तसेच तिथेही भारतीयांना रोजगाराच्या उत्तम संधी असल्याचे सांगितले. तर या सत्राच्या समारोप प्रसंगी बोलतांना सायबरचे संचालक डॉ. एस. पी. रथ यांनी भारत व श्रीलंका यांच्या संबंधाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून हे संबंध परस्परपूरक असून सायबर महाविद्यालयाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे भविष्यात श्रीलंकेमधील व पर्यायाने भारतातील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांच्या विचारांचे आदानप्रदान होण्यास निश्चितपणे मदत होईल असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी विश्वस्त डॉ. व्ही एम हिलगे व विश्वस्त सी.ए ऋषिकेश शिंदे यांनी परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.दुपारच्या सत्रामध्ये व्यवस्थापन, संगणकीकरण, वाणिज्य व समाजकार्य या विविध विषयांवरील शोध प्रबंधांचे सादरीकरण करण्यात आले. या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. किशोर कुमार व डॉ. श्रुती जामसांडेकर यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. टी. व्ही. जी. शर्मा यांनी केले. या परिषदेचे नियोजन व्यवस्थापकीय विश्वस्त व सचिव डॉ. रणजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.कोल्हापुरातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांचे बुधवारी निधन झाले. कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या परिषदेस सुमारे ८० हुन अधिक संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग दर्शवला असून उद्याच्या सत्रात देखील विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

🤙 8080365706