कोकणात आज -उद्या पावसाची शक्यता..

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम जाणवू शकतो. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याचे चित्र आहे.मंदोस चक्रीवादळामुळं तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

🤙 8080365706