
कोल्हापूर: जिल्हा नेहमीच सीमा वासियांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलेला आहे.सध्या केवळ राजकारणाचा भाग म्हणून मराठी माणसाची कळ काढली जात असून अशा प्रसंगी सीमा बांधवांना खंबीर पाठिंबा दर्शवण्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये शाहू समाधी परिसरामध्ये आंदोलन उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.

येथील शासकीय विश्रामगृहावर आज बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
